हॉर्न का वाजवतो? म्हणताच सोलापुरात हाणामारी अन् दगडफेक, पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गुन्हे लावले
सोलापूर गुन्हा: गाडीचा हॉर्न का वाजवला? असा जाब विचारताच झालेल्या किरकोळ वादातून सोलापूरमध्ये रविवारी रात्री दगडफेकीचा प्रकार घडला होता . या प्रकरणात आता 8 जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय . यात माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपिन पाटील यांच्यासह 8 जणांचा समावेश आहे. रऊफ अय्युब इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय . दरम्यान, या फिर्यादीपूर्वीच बिपिन पाटीलने दाखल केलेल्या फियार्दीनुसार पोलिसांनी 27 जणांवर गुन्ह्याची नोंद करत काही जणांना अटकही केली होती.
या प्रकरणात माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील, संदीप पाटील, रवी मंदकल, पवन तगादे, विनायक पाटील, नवीन गोटीपामुल आणि इतर दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे, प्राणघातक हल्ला करणे, आणि दगडफेक करत शांतता भंग करणे असे गंभीर आरोप आहेत.
माजी नगरसेवकाच्या मुलावर गंभीर आरोप
रविवारी रात्री रऊफ हे रियाज नदाफ या मित्रासह दुचाकीवरून जात असताना माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घरासमोर रस्ता अडवणाऱ्या गाड्यांना हॉर्न वाजवला .यावरून बिपिन पाटील यांनी हॉर्न का वाजवतो असे म्हणत रऊफ याच्याशी वाद घातला .डोक्यात फरशीचा तुकडा मारत मानेवर चाकूने वार केला अशी तक्रार रऊफ इनामदार याने दिलीय . दरम्यान ही तक्रार मिळण्याआधीच बिपिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रऊफ इनामदार सहजवळपास 27 जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .काही जणांना पोलिसांनी अटक देखील केलीय .विरोधी दाखल असलेल्या या गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत .
नेमकं प्रकरण काय?
रविवारी (22 जून) रात्री 10 च्या सुमारास सोलापुरातल्या घोंगडे वस्ती परिसरातील रऊफ इनामदार त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर आधी भांडणात झाले त्यानंतर दोन्ही गटाचे सुमारे 300 हुन अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आला. आणि दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत माजी नगरसेवक बिपीन पाटील याच्यासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झालेत. तर परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आक्रमक भूमिकेत घटनास्थळी गर्दी केलेल्या तरुणांना पोलिसांनी पांगवले. रात्री उशिरा जखमीना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
हेही वाचा
https://www.youtube.com/watch?v=k2uilcnjnkm
आणखी वाचा
Comments are closed.