देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी; चर्चेला उधाण
सोलापूर बातम्या: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Solapur Agricultural Produce Market Committee ) सभापती आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Congress leader Dilip Mane) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतला हजेरी लावली आहे. त्यांच्या या उपस्थितीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दिलीप मानेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने हे देखील मुखमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते.
अलीकडेच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप मानेंनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम आटपून परत निघताना सोलापूर विमानतळवर दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दिलीप माने यांची निवड
नुकतंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला होता. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. यात भाजपला फुल्ल सपोर्ट देत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते दिलीप माने यांची निवड झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज मंत्र्यांसोबत बैठक
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणारअसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री 8 वाजता बैठक होणार आहे. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असल्याची ही माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.