पालकांची लाखो रुपयांची लूट, संदीप शाहचे आणखी कारनामे समोर, कोणाकडून 50 तर कोणाकडून 28 लाख घेतले
सोलापूर: नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे प्रलोभना दाखवत पालकांची लूट केल्याचा आरोपाखाली CBI ने अटक आरोपी संदीप शाहला (संदीप शहा) अटक केली आहे. संदीप शाहने लाखो रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संदीप शाहचे आणखी काही प्रताप आता समोर आले आहेत. सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संदीप शाहच्या विरोधात या आधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची लूट
मूळचा सोलापूरचा असलेला संदीप शाह हा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून देतो, नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे आमिष देऊन विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची लूट करत होता.
सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संदीप शाह विरोधात या आधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2016 साली एका वर्तमानपत्रात संदीप शाह याने एमबीबीएस प्रवेश अशा आशयाची जाहीरात दिली होती. ती जाहिरात पाहून संदीप शाह याला संपर्क करणाऱ्या व्यक्तीला एमबीबीएस मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून तब्बल 50 लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या प्रकरणात एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून एका विद्यार्थिनीच्या पालकाकडून तब्बल 28 लाख रुपये घेतले होते. तर तिसऱ्या प्रकरणात दंतरोग महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बंगळूरूच्या प्रसिद्ध महाविद्यालयात MDS (ऑर्थो) मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दिले होते. या पालकाकडून सुमारे 10 लाख 34 हजार रुपयांची मागणी आरोपी संदीप शाह याने केली होती.
पैसे स्वीकारुन कोणालाही अॅडमिशन मिळवून दिले नाही
या सर्व प्रकरणात आरोपी संदीप शाह याने पैसे स्वीकारुन कोणालाही अॅडमिशन मिळवून दिले नाही. तीनही प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी आरोपी संदीप शाह विरोधात सोलापुरातील विजापूर नाका, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात जामीनावर तुरुंगातून सुटलेल्या संदीप शाह याने हा फसवणूकीचा धंदा सुरूच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी नीट 2025 च्या परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी 90 लाखांची मागणी करतं 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी संदीप शाह याला CBI ने अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Crime News: पंचतारांकीत हॉटेलमध्ये मिटींग अन् विद्यार्थ्यांमागे 90 लाखांची मागणी; नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष; पालकांना घातला लाखोंचा गंडा
आणखी वाचा
Comments are closed.