सोलापूर MIDC मध्ये भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू

सोलापूरच्या MIDC भागात भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही चार जण आत अडकले आहे. जे लोक इमारतीत लोक अडकले आहेत ते कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कुटुबीयांपैकी आहेत.

अक्कलकोट रोड भागातील MIDC मधील पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने तिघांना बाहेर काढले. पण त्यांच्या यात मृत्यू झाला. या आगीत सहाजण अडकले होते, त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

कारखान्यात सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक 78 वर्षाचे उस्मानभाई मन्सूरी, 24 वर्षाचा अनस मन्सूरी, 23 वर्षांची शिफा मन्सूरी आणि एक वर्षांचा युसूफ मन्सूरी हे या कारखान्यात अडकले आहेत. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्या नाहीत असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी लावला आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे आधूनिक उपकरणं नव्हती असेही नातेवाईकांनी म्हटले आहे.

Comments are closed.