ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन; सोलापुरात ‘लोकशाहीवादी’चे आंदोलन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी व चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा सामाविष्ठ करावीत, ही करीत लोकशाहीवादी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला.

‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा. या मागण्यांसह चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ठ करावीत, या मागणीसाठी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीवादी युवा महासंघाने तीव्र आंदोलन करत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी ‘मोदी-शहा मुर्दाबाद’, ‘ज्ञानेश कुमार मुर्दाबाद’, ‘संविधान जिंदाबाद’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला.

युवा महासंघाचे राज्य समिती सदस्य बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, मधुकर चिल्लाल, अमित मंचले, अभिजित निकंबे, बजरंग गायकवाड, राहुल बुगले, प्रदीप मरेड्डी, प्रशांत किटे, शिवा श्रीराम, विजय साबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed.