Solapur News – दुकानातून घरी परतत असताना पतंगाचा मांजा तोंडावर पडला, 13 वर्षीय मुलगा जखमी

पतंगाचा मांजा तोंडावर पडल्याने 13 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या नाकावर, डोळ्याच्या आणि कानाच्या बाजूला जखमा झाल्या आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णी बेंबळे रोडवर ही घटना घडली. प्रियांशु बाळासाहेब कदम असे जखमी मुलाचे नाव आहे.

प्रियांशु हा सोमवारी सायंकाळी किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेला होता. सामान घेऊन घरी परतत असताना बेंबळे रोडवरील जयश्री हॉस्पिटलजवळ तुटलेल्या पतंगाचा मांजा प्रियांशुच्या तोंडावर पडला. मांज्यामुळे प्रियांशुच्या नाकावर, डोळे आणि कानाच्या बाजूला जखम झाली.

प्रियांशुला तात्काळ खासगी रुग्णालयात नेत उपचार करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी टेंभुर्णीतील पतंग मांजा विकणाऱ्या दुकानांची तपासणी करत मांजा विकल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच मांजा लावून पतंग उडवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

Comments are closed.