रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत, आजोबांसारखं राजकारण करायला बघतात; राजेंद्र राऊतांचा ट
सोलापूर राजकारणाची बातमीः रोहित पवार हे अर्ध्या हळकुंडाने शहाणे झाल्यासारखे बोलतात. ते त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण करत असल्याचे भासवत आहेत. पण ते कशा पद्धतीने माहिती घेतात आणि बोलतात किमान ते त्यांनी पाहावे, असे वक्तव्य बार्शीचे (Barshi) माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केले. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे वाहन जाळण्याच्या प्रकरणावरून सोशल मीडियावरुन राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलाला लक्ष्य केले होते. या जाळपोळ प्रकरणात राजेंद्र राऊत यांचा मुलगा सहभागी असल्याचा संशय रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलून दाखवला होता. या आरोपांना राजेंद्र राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने शहाणे झाल्यासारखे बोलतात. ज्याची गाडी जळाली त्यानेदेखील पोलिसांत अज्ञात लोकांनी गाडी जाळली म्हणून फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात जो शिवीगाळ झाला, त्यात एका मुलीची छेडछाड झाली म्हणून रणवीर राऊत याने राग व्यक्त केला होता. रणवीर राऊत याचे काम पाहून त्याला बदनाम करण्याचे काम सध्या सुरु आहे. तो स्वतः वकील आहे, त्याच्यावर साधी कोणताही अदखलपात्र गुन्हा(NC) दाखल नाही. त्याने केलेली शिवीगाळअशोभनीय आहे, मी त्या भाषेचे देखील समर्थन करणार नाही. त्या घटनेनंतर देखील मी दोन दिवस रणवीर सोबत बोललेलो नाही, असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले.
आमचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, मावळे होते. आम्ही बार्शीत प्लॉटिंग व्यवसाय करून संपत्ती केली, पण तुमचे आजोबा काय होते? त्यांच्याकडून संपत्ती कुठून आली? रणवीर आणि माझ्यावर आता आरोप करता, तर तुम्ही कोणाचे घरं मोडलीत याची माहिती आमच्याकडे देखील आहे, असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला. या सगळ्याला आता रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Rohit Pawar: जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, रोहित पवारांचा राऊतांना टोला
शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी पेटवून देण्यात आली होती. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून शांताराम जाधवर यांना शिवीगाळ केली. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला होता.
https://www.youtube.com/watch?v=zlmds_p1epe
आणखी वाचा
अंतर्गत नाराजीतूनच माझा पराभव झाला, येणाऱ्या काळात चुकांची दुरुस्ती करणार : राजेंद्र राऊत
आणखी वाचा
Comments are closed.