Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी उपाय

लहान मुले ही प्रचंड चंचल असतात. त्यांचे मन सारखे भटकत असतात. मुलांमध्ये ही अशी चंचलवृत्ती असणे चांगले आहे. पण, काहीवेळा या चंचलवृत्तीमुळे मुले अभ्यासात मागे पडतात. डोक्यात सतत खेळणे, बागडणे असल्याने अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. परिणामी, अभ्यास नीट न केल्याने प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. पालकांनी कितीही दमदाटी करून अभ्यासाला बसवण्याचा प्रयत्न केला तरी मुलं काही मन लावून अभ्यास करायचे नाव घेत नाही. अशावेळी पालकांनी काही वास्तू उपाय करून पाहावेत. या वास्तू उपायांच्या मदतीने मुलांचे अभ्यासात नक्कीच मन लागण्यास मदत मिळेल.

  • वास्तुशास्त्रानुसार, मुलांच्या अभ्यासासाठी योग्य दिशेचा वापरण करणे आवश्यक असते. त्यामुळे मुलांना नेहमी पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास करायला बसवावे. यामुळे एकाग्रता वाढते.
  • मुलांच्या अभ्यासाची पुस्तके, वह्या सुद्धा तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावीत. जर शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवू शकता.
  • वास्तूशास्त्रात पूर्व आणि उत्तर दिशा शुभ मानल्या जातात. या दिशेकडे नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. त्यामुळे मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर काही दिवस या दिशेला त्यांना अभ्यासाला तुम्ही बसवू शकता.
  • मुलांच्या अभ्यासाच्या खोलीचा रंग फिकट असावा. तुम्ही मुलांच्या खोलीला फिकट पिवळा, गुलाबी किंवा हिरवा देऊ शकता. कारण गडद रंगामुळे मुलांचे लक्ष विचलित होते.
  • अभ्यासाच्या खोलीत तुम्ही देवी सरस्वती, गणपती किंवा प्रेरणादायी व्यक्तींची चित्रे लावू शकता.
  • मुलांच्या अभ्यासाच्या खोलीची कायम साफ-सफाई करावी. यामुळे मुलांना अभ्यास करायला कंटाळा येणार नाही.
  • मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर झोपताना मुलांचे डोकं नेहमी पूर्व दिशेला असेल याची खात्री करावी कारण यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.
  • तुम्ही मुलांकडून दररोज श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण करून घेऊ शकता. यामुळे गणेशाचा आशीर्वाद त्यांना मिळेल.
  • अभ्यासाच्या खोलीत पश्चिम, उत्तर आणि पूर्व दिशेला एक खिडकी अवश्य बनवा, जेणेकरून या खोलीत पूर्ण प्रकाश येईल.

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.