कोणी नृत्यात पारंगत, तर कोणी राजकारणात आघाडीवर! जाणून घ्या टॉप 10 भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी काय करतात?
भारतामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर एक जबरदस्त भावनिक नातं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. मैदानावर जशी त्यांची कामगिरी कौतुकास्पद असते, तितकीच उत्सुकता लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य चाहत्यांच्या अधिक जवळ आले आहे. आज आपण अशा 10 भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या फक्त त्यांच्या पतींसाठी आधारस्तंभ ठरल्या नाहीत, तर स्वतःच्याही करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनुष्का शर्मा – विराट कोहलीची पत्नी
अनुष्का ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती आहे. तिने 2008 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2017 मध्ये तिचा विराट कोहलीसोबत विवाह झाला. त्यांना वामिका आणि अकाय ही दोन मुले आहेत. अनुष्का यशस्वी उद्योजिका देखील आहे.
साक्षी सिंग – एम.एस. धोनीची पत्नी
साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. ताज हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत असताना तिची आणि धोनीची ओळख झाली. त्यांनी 2010 मध्ये लग्न केलं आणि 2015 मध्ये त्यांच्या मुलीचा, झीवा, जन्म झाला. साक्षी समाजसेवेशी देखील जोडलेली आहे आणि स्वतःचा फाउंडेशन चालवते.
रितिका साजदेह – रोहित शर्मा यांची पत्नी
रितिका ही एक स्पोर्ट्स मॅनेजर आहे आणि ती कॉर्नरस्टोन नावाच्या कंपनीसोबत अनेक वर्षांपासून काम करते. 2015 मध्ये तिचा रोहितसोबत विवाह झाला आणि त्यांना समायरा व अहान ही दोन मुले आहेत. ती अनेक वेळा स्टेडियममध्ये रोहितचा सामना पाहताना दिसते.
उत्कर्षा गायकवाड – रुतुराज गायकवाडची पत्नी
उत्कर्षा ही स्वतः एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे. तिने लिस्ट A आणि टी20 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ती फिटनेस आणि न्यूट्रिशन विषयात शिक्षण घेत आहे आणि पुण्यातील INFS संस्थेत शिकत आहे. रुतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाह 3 जून 2023 रोजी झाला.
प्रीती नारायणन – रविचंद्रन अश्विनची पत्नी
प्रीती ही अश्विनची शाळा आणि कॉलेजमधली मैत्रीण आहे. त्यांचा विवाह 2011 मध्ये पारंपरिक पद्धतीने झाला. त्यांना दोन मुली आहेत. प्रीती नेहमी अश्विनच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यात त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.
रीवाबा जडेजा – क्रिकेट आणि राजकारणाचा संगम
रीवाबा ही एक इंजिनिअर असून भाजपाशी संबंधित नेत्या आहे. ती गुजरात विधानसभा सदस्य आहे. 2016 मध्ये तिचा रवींद्र जडेजासोबत विवाह झाला आणि तेव्हापासून ती सार्वजनिक जीवनाचा भाग झाली. त्यांना एक मुलगी आहे.
संजना गणशान – जसप्रीत बुमराहची पत्नी
संजना ही एक लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर आहे. तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सूत्रसंचालन केलं आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने मॉडेलिंग आणि मीडियामध्ये करिअर सुरू केलं. 2021 मध्ये तिचा बुमराहसोबत विवाह झाला आणि त्यांचा अंगद एक मुलगा आहे.
अथिया शेट्टी – के.एल. राहुलची पत्नी
अथिया ही बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. तिने 2015 मध्ये फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि 2023 मध्ये केएल राहुलसोबत लग्न केलं. या जोडप्याने 2025 मध्ये इवारा या मुलीला जन्म दिला.
देविशा शेट्टी – सूर्यकुमार यादवची पत्नी
देविशा ही एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे आणि पूर्वी नृत्य शिक्षक म्हणून काम करत होती. तिने 2016 मध्ये सूर्यकुमारसोबत विवाह केला आणि आता ती बेकिंग आणि सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहे.
जया भारद्वाज – दीपक चाराची पत्नी
जया दिल्लीची रहिवासी असून ती कॉर्पोरेट जगतात काम करत होती. 2022 मध्ये तिचा दीपक चाहरसोबत विवाह झाला. दोघांनी मिळून एक स्पोर्ट्स टेक कंपनी सुरू केली आहे, जी फँटसी गेमिंगशी संबंधित आहे.
Comments are closed.