सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू दुर्धर आजाराने झाला अशी खोटी माहिती विधिमंडळात देणाऱया फडणवीस सरकारच्या अब्रूची लक्तरे न्यायदंडाधिकाऱयांच्या चौकशी अहवालाने काढली आहेत. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीतच झाल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. आयोगाने याची दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांना उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची नासधूस करण्यात
आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून 11 डिसेंबर रोजी परभणी शहरासह अनेक ठिकाणी चक्का जाम करण्यात आला होता. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. ‘14 डिसेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते. तर कुटुंबीयांनी पोलिसांवर अमानुष अत्याचाराचा आरोप केला होता.
कुटुंबाचा लढा सुरूच
सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजया सूर्यवंशी यांनी जोपर्यंत मारकुटय़ा पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. सरकारने देऊ केलेली 10 लाख रूपयांची मदत स्वीकारण्यासही सूर्यवंशी कुटुंबाने नकार दिला. आमची लढाई न्यायासाठी असून तो मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे विजया सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
या पोलिसांवर होऊ शकते कारवाई!
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावर निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. तसेच, या प्रकरणात मानवाधिकार आयोग आणि न्यायालय यासंदर्भात पुढील कायदेशीर पावले उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून 11 डिसेंबर रोजी परभणी शहरासह अनेक ठिकाणी चक्का जाम करण्यात आला होता. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता.14 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते.
कुटुंबाचा लढा सुरूच
सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजया सूर्यवंशी यांनी जोपर्यंत मारकुट्या पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. सरकारने देऊ केलेली 10 लाख रुपयांची मदत स्वीकारण्यासही सूर्यवंशी कुटुंबाने नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते.
70 पोलिसांवर आरोप
न्यायदंडाधिकारी सी. यू. तेलगावकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी चौकशी केली. त्याबाबतचा गोपनीय अहवाल नुकताच मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. आयोगाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जून रोजी ठेवली असून न्यायदंडाधिकाऱयांनी आपल्या अहवालात 70 पोलिसांवर ठपका ठेवला आहे. या पोलिसांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Comments are closed.