‘सन ऑफ सरदार-2’ची 6.76 कोटींची ओपनिंग

अजय देवगणचा चित्रपट ‘सन ऑफ सरदार-2’ शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.76 कोटी रुपयांची कमाई केली. ‘सन ऑफ सरदार-2’ सोबत ‘धडक-2’ हा चित्रपटही शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘सन ऑफ सरदार-2’मध्ये अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, रवि किशन आणि दीपक डोबरीवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘धडक-2’मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments are closed.