‘सन ऑफ सरदार’ फेम अभिनेते मुकुल देव यांचे निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात काम करणारे अभिनेते मुकुल देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुल देव यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
बॉलीवूड अभिनेते विंदू दारा सिंह यांनी माध्यमांशी बोलताना मुकुल देव यांच्या निधनाची माहिती दिली. मुकुल बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या निधनामुळे आम्हाला धक्का बसला आहे. त्याच्या पालकांच्या निधनानंतर मुकुल एकटाच राहत होता.त्यामुळे त्यांने लोकांना भेटणं कमी केलं होतं. त्यामुळे आमचं बोलणंही कमी व्हायचं. पण तो खरोखरच एक चांगला माणूस होता आणि आम्हाला त्याची खूप आठवण येईल, असे ते यावेळी म्हणाले.
शांततेत विश्रांती घ्या माझा भाऊ #Mukuldev ! आपल्याबरोबर घालवलेला वेळ नेहमीच प्रेमळ असेल आणि #सोनोफसार्डार 2 आपला स्वानसॉन्ग असेल जिथे आपण दर्शकांपर्यंत आनंद आणि आनंद पसरवाल आणि त्यांना हसून खाली पडू शकाल! pic.twitter.com/oyj4j7kqgu
– विंडो दारा सिंह (@रील्विंडस) मे 24, 2025
मुकुलने 1996 मध्ये दस्तक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी हिम्मतवाला, यमला पगला दीवाना, सन ऑफ सरदार, आर राजकुमार, जय हो, भाग जॉनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. याशिवाय मुकुलने काही बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले होते. ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना 7 वा अमरीश पुरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Comments are closed.