सोनल दिनुशाने रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज, कसोटी क्रिकेटमध्ये चमत्कार

श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे पाहुणा संघ सहज जिंकणार असे वाटत असताना श्रीलंकेचा फलंदाज त्यात अडसर ठरला. सोनल दिनुशाने कोलंबो कसोटीत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात म्हणजे पाचव्या दिवशी शतकी खेळी केली आणि भारताचा विजय अवघड केला. त्याचबरोबर तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनोखी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला.

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कोलंबोमध्ये 23 ऑगस्टपासून खेळल्या गेलेल्या या सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशीही लागला नाही. या सामन्याच्या श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातही दिनुशाने शतकी खेळी केली. त्याने हे शतक 196 चेंडूतच केले.

कोलंबो कसोटीच्या पाचव्या दिवसाचा टी ब्रेक झाला असता सोनल 98 धावांवर नाबाद होता. त्याने तिसऱ्या सत्रात दोन धावांची भर घालत ऐतिहासिक शतक केले. त्याचे हे या कसोटी मालिकेतील तिसरे शतक ठरले.

सोनल भारताविरुद्धच्या आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करणे शक्य झाले नाही.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सोनलची शतके
सोनलने गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 100 आणि दुसऱ्या डावात 84 धावा केल्या. तसेच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 103 धावा केल्या असून दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे.

सोनल भारताविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 डावांमध्ये 420 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 140 अशी प्रभावी राहिली.

सोनल भारताविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी डावांमध्ये 50+ धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 67 वर्षांनंतर ही अनोखी कामगिरी झाली. याआधी 1959 मध्ये इंग्लंडच्या केन बॅरिंग्टनने भारताविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. (Sonal Dinusha makes history! Becomes first batsman to score 3 centuries in his first two test vs ind colombo test)

भारताविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावांची खेळी करणारे
डग्लस जार्डिन (इंग्लंड) – 1932 ते 1934
एव्हर्टन वीक्स (वेस्ट इंडीज) – १९४८
क्लाईड वॉलकॉट (वेस्ट इंडीज) – १९४८
केन बॅरिंग्टन (इंग्लंड) – 1959
सोनल दिनुषा (श्रीलंका) – 2026

दुसऱ्या डावात शतकी खेळी केल्याने सोनलचा ॲलन बॉर्डर आणि तिलकरत्ने दिलशान यांच्या एका खास यादीत प्रवेश झाला आहे.

कसोटी सामन्यात क्रमांक 6 किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकार फलंदाजीला येत दोनदा शतकी खेळी करणारे
ॲलन बॉर्डर – 150* आणि 153 विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, 1980
तिलकरत्ने दिलशान – 162 आणि 143 वि बांगलादेश, चट्टोग्राम, 2009
धनंजया डी सिल्वा – 102 आणि 108 वि बांगलादेश, सिल्हेट, 2024
कामिंदू मेंडिस – 102 आणि 164 वि बांगलादेश, सिलहट, 2024
सोनल दिनुशा – 103 आणि 133* विरुद्ध भारत, कोलंबो, 2026

Comments are closed.