सोनम वांगचुक यांचे संसदीय समितीने कौतुक केले.
एचआयएएलला युजीसी मान्यता मिळावी अशी शिफारस
वृत्तसंस्था/ लेह
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटकेत असलेले लडाखमधील समाजसेवक सोनम वांगचूक यांचे संसदेच्या एका स्थायी समितीने कौतुक पेले आहे. वांगचूक यांच्याकडून स्थापन हिमालयन इन्स्टीट्यूट आाrफ अल्टरनेटिव्हजच्या (एचआयएएल) कामकाजाचे कौतुक करत याला युजीसीची मान्यता देण्याची शिफारस केली आहे.
काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका संसदीय समितीच्या अहवालात लडाखचे शिक्षणतज्ञ तसेच कार्यकर्ते वांगचूक यांच्याकडून स्थापन एचआयएएल ‘अनुकरणीय’ कार्य करत असून याला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता दिली जावी असे नमूद करण्यात आले आहे.
युजीसीकडून एचआयएएलच्या प्रलंबित मान्यतेवर समितीने चिंता व्यक्त केली आहे. शिक्षण मंत्रालयाने एचआयएएल मॉडेलचे अध्ययन करत याला शिक्षण नवोन्मेष केंद्र किंवा अन्य हस्तक्षेपांच्या माध्यमातून अन्य ठिकाणी कसे स्वीकारले जाऊ शकते यावर विचार करावा अशी शिफारस समितीने केली आहे.
लडाखच्या स्वत:च्या अध्ययन दौऱ्यादरम्यान समिती हिमालयन इन्स्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज, लडाख (एचआयएएल) असलेल्या शैक्षणिक, संशोधन आणि उद्योजकतेच्या वातावरणाने प्रभावित झाली, विशेषकरून स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक आणि परिस्थिती संदर्भात अनुभव आधारित शिक्षण आणि पठणाच्या पद्धती लागू करण्यात याच्या यशामुळे समिती प्रभावित झाली आहे.
युजीसीने एचआयएएलला अद्याप मान्यता दिलेली नाही हे कळल्यावर शिक्षण, महिला, युवा आणि क्रीडाविषयक स्थायी समितीने चिंता व्यक्त केली आहे. एचआयएएलने स्थानिक समुदायावर मोठा प्रभाव पाडला असून स्वत:च्या बर्फाचे स्तूप आणि अन्य सामुदायिक सहभाग कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली असल्याचे समितीला आढळून आले.
एचआयएएल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीत आदर्श असून ते अशाप्रकारच्या अनुभव आधारित आणि प्रकल्प-आधारित शिक्षण, सामुदायिक सहभाग आणि भारतीय ज्ञान प्रणालींच्या एकीकरणाचे आवाहन करते. अहवालानुसार एचआयएएलला मान्यता देण्याचा विचार युजीसीने करावा अशी शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.
लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि सहाव्या अनुसूचीत सामील करण्याच्या मागणीवरून झालेल्या हिंसक निदर्शनांच्या दोन दिवसांनी 26 सप्टेंबर रोजी वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. तर हिंसक निदर्शनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 90 जण जखमी झाले होते. वांगचूक यांनीच हिंसा भडकविल्याचा आरोप आहे.
Comments are closed.