सोनिया गांधी यांची प्रकृती वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.
रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील. डॉ. डी. एस. राणा, डॉ. एस. नुंदी आणि डॉ. अरूप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना 24 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर पोट आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता तपासत असून त्यांना प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) दिली जात आहेत, असे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले. सोनिया गांधी यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
Comments are closed.