दक्षिण आफ्रिकेने निवडला वर्ल्ड कपसाठी संघ, दोन मोठे फलंदाज संघाबाहेर!

दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. एडन मार्करम संघाचे नेतृत्व करतील, परंतु रायन रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोन धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान मिळालेले नाही. दुखापतीमुळे भारताविरुद्धची मालिका न खेळू शकलेल्या कगिसो रबाडाने वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या या संघात असे काही खेळाडू आहेत, जे आपला पहिला टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. क्वेना मफाका, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, जॉर्ज लिंडे आणि जेसन स्मिथ हे खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत आहेत. संघात जेसन स्मिथचे नाव धक्कादायक आहे, कारण त्याला आतापर्यंत केवळ 5 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मात्र, CSA टी20 चॅलेंजच्या प्लेऑफ सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे, आतापर्यंत भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि अफगाणिस्तान यांनीही आपले वर्ल्ड कप संघ जाहीर केले आहेत.

2026 टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान, न्यूझीलंड, कॅनडा आणि यूएई (UAE) सोबत ‘ग्रुप D’ मध्ये ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 9 फेब्रुवारीला कॅनडाविरुद्धच्या सामन्याने करेल. टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे भूषवत आहेत.

टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
एडन मार्कराम (उजवीकडे), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोर्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, जेसन स्मिथ.

Comments are closed.