दक्षिण आफ्रिकेचा टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, 15 जणांच्या टीममध्ये कोणाला संधी दिली?
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्त्व एडन मारक्रम करणार आहे. मात्र, रेयान रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स हे दोन आक्रमक फलंदाज संघात स्थान मिळवू शकलेले नाहीत. कगिसो रबाडानं टी 20 वर्ल्ड कपसाठी कमबॅक केलं आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा कगिसो रबाडा दुखापतीमुळं संघाबाहेर होता.
दक्षिण आफ्रिकेकडून नवोदितांना संधी
दक्षिण आफ्रिकेनं अनेक नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. क्वेना मफाका, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, जॉर्ज लिंडे आणि जेसन स्मिथ पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत.
जेसन स्मिथला फक्त पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या CSAT20 चॅलेंजच्या प्ले ऑफमध्ये त्यानं 19 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली होती. ज्यामुळं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान, अफगाणिस्तान यांच्याकडून संघ जाहीर करण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कपमध्ये ड गटात आहे. या गटात त्यांच्यासह अफगाणिस्तान, न्यूझीलँड, कॅनडा आणि यूएईचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेची पहिली मॅच 9 फेब्रुवारीला कॅनडा विरुद्ध आहे. टी 20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 8 मार्चला फायनल होणार आहे. या वरल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केलं जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय संघ: एडन मार्कराम (उजवीकडे), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोर्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, जेसन स्मिथ.
🚨 पथकाची घोषणा 🚨
दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष निवड समितीने 07 फेब्रुवारी ते 08 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 साठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
T20 आंतरराष्ट्रीय (T20I) कर्णधार एडन मार्कराम संघाचे नेतृत्व करेल, जे… pic.twitter.com/EqZvYPpCga
— प्रोटीज पुरुष (@ProteasMenCSA) 2 जानेवारी 2026
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं देखील आजच टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नाथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झाम्पा.
आणखी वाचा
Comments are closed.