बुमराह-अर्शदीपने द. आफ्रिकेचा कणाच मोडला; पण वरुण चक्रवर्ती ठरला गेम चेंजर, मिलरचं अर्धशतक

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 T20 विश्वचषक 2026 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8च्या पहिल्या अटीतटीच्या सामन्यात गोलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले. सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. पण एका बाजूने विकेट्स पडत असताना अनुभवी डेव्हिड मिलरने मैदानावर तग धरला. मिलरने मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तेव्हा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या मिस्ट्री फिरकीने सामन्याचे चित्र पालटले. द. आफ्रिकेने भारतासमोर 188 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.

बुमराह-अर्शदीपने विरोधकांचा कणाच मोडला!

डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. संघाचा हुकमी एक्का क्विंटन डी कॉक अवघ्या 6 धावांवर माघारी परतला. बुमराहच्या या धक्क्यातून सावरण्याआधीच अर्शदीप सिंगनेही आपला धारदार मारा सुरू केला. कर्णधार एडेन मार्करामला त्याने केवळ 4 धावांवर बाद केले, त्याचा हार्दिक पांड्याने झेल टिपला. यावरच थांबायचे नाही, तर बुमराहने रायन रिकेल्टनलाही 7 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अवघ्या 20 धावांत आफ्रिकेचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने पाहुण्या संघाचा कणा अक्षरशः मोडला.

ब्रेव्हिस-मिलरचं वादळ आणि टीम इंडियाचं टेन्शन

जेव्हा आफ्रिका संकटात होती, तेव्हा डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांनी तांडव घेतला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची चांगली धूलाई केली आणि चौथ्या विकेटसाठी तब्बल 97 धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने 45 धावा केल्या, पण मोक्याच्या क्षणी शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेकने त्याचा अफलातून झेल टिपला आणि ही जोडी फुटली.

मिलरचं अर्धशतक, पण वरुण ठरला ‘गेम चेंजर’

डेव्हिड मिलर आज वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताच्या हातातून सामना हिरावून नेतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण खरा वरुण चक्रवर्तीने दिला, त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मिलरला अडकवलं. 35 चेंडूत 63 धावांच्या झंझावाती खेळीनंतर  झेल झाला. डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत सात गडी बाद 187 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, तर अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे ही वाचा –

Smriti Mandhana : तुमच्या भावनांची कोणाला पडलीये…; स्मृती मानधानाची ‘ती’ पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.