दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला! टी-20 वर्ल्ड कप सुरू असतानाच बोर्डाचा मोठा निर्णय

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) सुरू असतानाच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी अनुभवी केशव महाराजकडे (Keshav Maharaj) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या वर्ल्ड कप संघातील केवळ 3 खेळाडूंनाच या दौऱ्यात स्थान मिळाले असून, एडन मारक्रमसह इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
भविष्यातील संघ बांधणी लक्षात घेता या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने 5 अनकॅप्ड (पदार्पण न केलेल्या) खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये ईथन बॉश, कॉनर एस्टरहुइजन, डियान फॉरेस्टर, जॉर्डन हरमन आणि नकोबानी मोकोएना यांचा समावेश आहे.
टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे, त्यानंतर लगेच 15 मार्चपासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांची मालिका सुरू होईल. ही मालिका 25 मार्चपर्यंत चालेल. या मालिकेनंतर लगेच आयपीएल (IPL) सुरू होणार असल्याने खेळाडूंवरचा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघातून फक्त केशव महाराज, जॉर्ज लिंडे आणि जेसन स्मिथ हे तिघेच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत. सध्या आफ्रिकेचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचला असून, रविवारी (22 फेब्रुवारी) अहमदाबादमध्ये त्यांचा सामना भारताशी होणार आहे.
न्यूझीलंड मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
केशव महाराज (टेनर), ओटनीएल बार्टमन, इथन बॉश, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्झी, कॉनर एस्टरह्युझेन, डियान फॉरेस्टर, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, नकोबानी मोकोएना, अँडिले सिमेलेन, लुथो सिपामाला, प्रेनलन सुब्रेन आणि एस जेसन.
Comments are closed.