पाकिस्तानची मालिका बरोबरीत सोडवली, दक्षिण आफ्रिका भारताच्या दौऱ्यावर येणार, कसोटीसाठी संघ जाहीर


नवी दिल्ली : पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी,  3 एकदिवसीय सामने आणि  5 टी 20 सामने दोन्ही संघ खेळणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

भारताचा कॅप्टन म्हणून शुभमन गिल याची देशातील ही दुसरी मालिका असेल. गिलच्या नेतृत्त्वात भारतानं वेस्ट इंडिजवर 2-0 असा विजय मिळवला होता. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तान विरुद्धची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. त्या मालिकेतील पहिली मॅच पाकिस्ताननं जिंकली होती तर दुसरी कसोटी दक्षिण आफ्रिकेनं जिंकली होती.

पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व एडन मार्क्रम करत होता. मात्र, आता तेम्बा बावुमानं कमबॅक केलं आहे. कॅप्टन म्हणून तेम्बा बावुमा भारताविरूद्धच्या मालिकेत खेळेल. बावुमाच्या नेतृत्त्वात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभूत केल होतं.

South Africa Test Team for India Tour : दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन वॉश, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सेन, एडन मार्कराम, झुबेर हमजा, केशव महाराज, रायन रिकेल्टन, टोनी डी जोर्जी, सेनुरन मुथुसामी, ट्रिस्टन स्टब्स, कागिसो रबाडा, काइल वेरे, विआन हर्मेर, सिमोन मुलडर,

दक्षिण आफ्रिका आठव्यांदा भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे यापूर्वी भारतानं चारवेळा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेनं एकदा मालिका जिंकली आहे. तर, दोन वेळा मालिका बरोबरीत सुटली आहे.  1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतात कसोटी मालिका जिंकली होती.त्यानंतर भारतात दक्षिण आफ्रिकेनं पाच वेळा कसोटी मालिका खेळल्या मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका वेळापत्रक

पहिली कसोटी

तारीख – 14 ते  18 नोव्हेंबर

ठिकाण- ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता

दुसरी कसोटी

तारीख – 22 ते 26 नोव्हेंबर

ठिकाण- आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.