दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड सुरूच! अखेरच्या सुपर-8 लढतीत झिम्बाब्वेला हरविले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकमेव अजेय संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेचा सहज पराभव करीत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अष्टपैलू कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा कर्णधार सिपंदर रझाला ‘सामनावीरा’चा बहुमान मिळाला. या विजयासह दक्षिण आफ्रिका गट-1च्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असून आता 4 मार्चला कोलकाता येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला उपांत्य सामना खेळणार आहे.

स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आपल्या अखेरच्या सुपर-8 सामन्यात झिम्बाब्वेचा 5 विकेट्सने पराभव केला. अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेकडून मिळालेले 154 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 17.5 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक 42 धावा केल्या. याचबरोबर रायन रिकेल्टन (31), जॉर्ज लिंडे (30), डेव्हिड मिलर (22) व ट्रिस्टन स्टब्स (21) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. झिम्बाब्वेकडून सिपंदर रझाने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 7 बाद 153 धावा केल्या. यात कर्णधार सिपंदर रझाने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली, तर क्लाईव्ह मंदडे (26) धावांची विशी ओलांडणारा दुसरा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून क्वेना माफाका व कॉर्बिन बॉश यांनी 2-2 फलंदाज बाद केले. जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी व अॅन्रीच नॉर्तजे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली

Comments are closed.