दक्षिण आफ्रिकन फलंदाजाने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, ODI क्रिकेटमध्ये रचला अभूतपूर्व इतिहास

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा 98 धावांनी पराभव केला. या सामन्यात मॅथ्यू ब्रीट्झके आणि केशव महाराज यांनी आफ्रिकन संघासाठी शानदार कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रीट्झकेने सामन्यात 56 चेंडूत एकूण 57 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार आणि एक षटकार होता.

मॅथ्यू ब्रीट्झकेने 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी पदार्पण केले. त्यानंतर, त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात 150 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने आपली दमदार फलंदाजी सुरू ठेवली आणि 83 धावांची खेळी खेळली. आता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील तिसरा सामना खेळण्याची संधी मिळाली आहे आणि यामध्ये त्याने 57 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 धावा केल्या आहेत.

मॅथ्यू ब्रीट्झकेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये निक नाईटचा विश्वविक्रम मोडला आहे. आता ब्रीट्झके त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. निक नाईटने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 264 धावा केल्या होत्या. आता ब्रीट्झकेने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 296 धावा केल्या. एडेन मार्कराम (82 धावा) आणि रायन रिकेल्टन (33 धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. कर्णधार टेम्बा बावुमाने 65 धावा केल्या. मॅथ्यू ब्रीट्झकेने 57 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच आफ्रिकन संघ मोठा धावसंख्या उभारू शकला. दुसरीकडे, केशव महाराजांच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने पाच विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियन संघ 198 धावांवर ऑलआउट झाला.

Comments are closed.