‘जन नायगन’ची डरकाळी घुमली… वाढदिवसाची खास भेट

साऊथ सुपरस्टार थलापती विजयला त्याच्या 51 व्या वाढदिवशी खास भेट मिळाली आहे. 22 जूनला थलापती विजयच्या ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’चा टीझर लाँच करण्यात आला. केव्हीएन प्रॉडक्शन्सने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’ असे कॅप्शन देत टीझर शेअर केला आणि विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’च्या टीझरची सुरुवात विजयच्या आवाजाने होते. टीझरमध्ये विजय म्हणतो, ‘तुम्ही लोक माझ्या हृदयात जिवंत राहाल. एक खरा नेता सत्तेसाठी नाही तर लोकांसाठी आवाज उठवतो.’ त्यानंतर विजय पोलीस गणवेशात हातात तलवार घेऊन दंगलग्रस्त भागातून जातो. त्यानंतर तो रक्तानं माखलेल्या तलवारीच्या टोकानं मिशा सेट करताना दिसते.

Comments are closed.