Sunita Williams – सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार, नासा-SpaceX ने दिली गुड न्यूज

हिंदुस्थानी वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बूच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून हे दोघेही अंतराळात अडकलेले आहेत. मात्र आता या दोघांनाही धरतीवर आणण्यासाठी एलन मस्क यांच्या स्पेस एक्सने पुढाकार घेत नासाच्या मदतीने अंतराळ यान पाठवले आहे.
शनिवारी पहाटे साडे चारच्या सुमारास नासा आणि स्पेस एक्सने क्रू -10 मिशन लॉन्च केले. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून हे अंतराळ यान आकाशात झेपावले आहे. या मिशनद्वारे 4 सदस्य अंतराळात पोहोचणार असून 19 मार्चपर्यंत सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर आणले जाईल.
‘क्रू-10 मिशन’ अंतर्गत चार सदस्य अंतराळात गेले आहेत. क्रू-10 मध्ये नासाच्या अंतराळवीर अॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स यांच्यासह जपानी अंतराळ संस्थेतील दोन अंतराळवीरांचा समावेश आहे. हे सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांची स्पेश स्टेशनमध्ये जागा घेतील.
एक नवीन क्रू त्याच्या मार्गावर आहे @स्पेस_स्टेशन!
#क्रू 10 वरून उचलले @Nasakenney शुक्रवार, 14 मार्च रोजी संध्याकाळी 7:03 वाजता ईटी (2303 यूटीसी), कमी पृथ्वीच्या कक्षामध्ये नवीन वैज्ञानिक सीमेवर सेट करण्यासाठी: https://t.co/jpv9nciz4t pic.twitter.com/i28a8ylodj– मध्ये (@nasa) 15 मार्च, 2025
याआधी नासाचे अंतराळवीर निक हेग आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेवर आयएसएसमध्ये पाठवण्यात आले, ज्यामध्ये अडकलेल्या अंतराळवीरांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या. पण तेही मिशन अयशस्वी झाले.
अनेक विक्रम नावावर
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यांनी सर्व मिशनदरम्यान 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक केला आहे. तसेच 150 हून अधिक युनिक सायंटिफिक एक्सपेरिमेंट आणि टेक्नोलॉजी टेमोन्सट्रेशनवर काम केले. ज्यामध्ये 900 तासांहून अधिक संशोधन केले. स्वतःला फीट ठेवण्यासाठी सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्टेशनवर वेट ट्रेनिंगसुद्धा घेतली.
Comments are closed.