स्पेनने अमेरिकेला दिला मोठा धक्का, इराणविरुद्ध युद्धात हवाई हद्द वापरू देण्यास दिला नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील युद्धात इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अमेरिकेला त्यांच्याच मित्रराष्ट्राने मोठा झटका दिला आहे. स्पेनने आपल्या हवाई हद्दीतून अमेरिकन हवाई दलाच्या (US Air Force) विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या भीषण संघर्षात सामील न होण्याचा निर्णय स्पेन सरकारने घेतला असून, या निर्णयामुळे अमेरिकेच्या युद्ध मोहिमेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यांसाठी आणि रसद पुरवण्यासाठी स्पेनच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची विनंती केली होती. मात्र स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या सरकारने ही विनंती फेटाळून लावली आहे. “आम्ही या युद्धाचा भाग बनू इच्छित नाही आणि आमच्या भूमीचा किंवा हवाई हद्दीचा वापर कोणत्याही लष्करी हल्ल्यासाठी होऊ देणार नाही,” अशी भूमिका स्पेनने घेतली आहे. स्पेनच्या या निर्णयामुळे नाटो (NATO) देशांमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

स्पेनच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला आता इराणपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी आणि लांबच्या मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे, ज्यामुळे युद्धाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढणार आहे. हिंदुस्थानसह जगातील अनेक देश या युद्धापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असताना, युरोपातील एका महत्त्वाच्या देशाने अमेरिकेला अशा प्रकारे रोखणे हा जागतिक राजकारणातील एक मोठा वळणबिंदू मानला जात आहे.

Comments are closed.