Speaking in the Legislative Council Anil Parab compared himself with Chhatrapati Sambhaji Maharaj
शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अनिल परब यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे विधान करत त्यांनी स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून त्यांचा अवमान करण्यात येत आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अनिल परब यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे विधान करत त्यांनी स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे अनिल परब यांचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने शुक्रवारी (7 मार्च) आंदोलन करण्यात येणार आहे. (Speaking in the Legislative Council Anil Parab compared himself with Chhatrapati Sambhaji Maharaj)
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना अनिल परब म्हणाले की, प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी हिंमत नाही. तुम्ही त्यांना वाचवतात आणि राज्यपालांना चुकीची माहिती देता. परवाच्या दिवशी सांगितलं की, संभाजी महाराज असे होते, तसे होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल केले. संभाजी महाराजांना धर्म बदला नाहीतर तुमचे डोळे काढून टाकू, असे सांगितले गेले. त्यांचे हात आणि पाय छाटले. परंतु संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत आपला धर्म बदलला नाही. ते आपल्या मतावर ठाम राहिले. औरंगजेबाच्या दबावाला बळी पडले नाही. संभाजी महाराजांचा धर्म बदलावा म्हणून छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला, असे म्हणत परब यांनी त्यांच्यावर कारवाईची माहिती दिली.
हेही वाचा – Anil Parab Vs Neelam Gorhe : गोऱ्हे सभापतींच्या खुर्चीवर, परबांनी घेतला आक्षेप; नेमकं काय घडलं?
अनिल परब म्हणाले की, माझ्यावरही ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली. संजय राऊत थोडं कच्चे निघाले, परंतु मी पुरून उरलो. माझ्यावर अत्याचार झालेले आहेत. मी त्यांचा (संभाजी महाराजांचा) वारसा जपणारा आहे. मी माझा पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान आहे. तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला त्यांच्याबद्दल सांगत आहेत. त्यांना (शिंदे गटाला) जरा हूल दिली आणि ते सगळे तिकडे निघून गेले आणि आता आम्हाला छत्रपतींचा वारसा सांगत आहेत, असे म्हणत अनिल परब यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा – Eknath Khadse : शाळांसाठी पैसे नाहीत, मग कशाच्या जोरावर घोषणा जाहीर करता? खडसे संतापले
Comments are closed.