जय शाह यांची सौरव गांगुलींना खास बर्थडे भेट! 'दादा' आता आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये!
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांना त्यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये (Saurav Ganguly now included Icc Hall of Fame) समाविष्ट करण्यात आले आहे. या मोठ्या सन्मानाबद्दल त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांचे आभार मानले आहेत. सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
गांगुली हे आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे भारताचे 10 वे पुरुष क्रिकेटपटू ठरले आहेत. या यादीत भारताच्या 2 महिला क्रिकेटपटूंचाही समावेश आहे, त्यामुळे एकूण 12 भारतीय खेळाडूंना आतापर्यंत हा बहुमान मिळाला आहे.
‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करताना दादा म्हणाले, मला हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिल्याबद्दल आयसीसी आणि चेअरमन जय शाह यांचे मनापासून आभार. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आतापर्यंत या यादीत स्थान मिळवलेल्या 10 भारतीयांपैकी एक असणे आणि काही महान नावांच्या पंक्तीत बसणे, ही खूप अद्भुत गोष्ट आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बीसीसीआयलाही टॅग केले आहे.
गांगुलींना या वाढदिवशी दुहेरी भेट मिळाली आहे. एक म्हणजे त्यांच्यावर आधारित असलेल्या ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ या बायोपिकची रिलीज डेट जाहीर झाली आहे, जो चित्रपट 14 मे 2027 रोजी प्रदर्शित होईल आणि दुसरे म्हणजे आयसीसीने दिलेला हा मोठा सन्मान आहे.
सौरव गांगुली यांची क्रिकेट कारकीर्द पाहिल्यास, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 113 कसोटी सामन्यांच्या 188 डावांत त्यांनी 42.17 च्या सरासरीने 7,212 धावा केल्या आहेत, ज्यात 16 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 239 आहे. तसेच, गोलंदाजी करताना त्यांनी 99 डावांत 32 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच, वनडे क्रिकेटमध्ये 300 डावांत 41.02 च्या सरासरीने त्यांच्या बॅटमधून 11,363 धावा निघाल्या आहेत. यादरम्यान त्यांनी 22 शतके आणि 72 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच, गोलंदाजीत 171 डावांत त्यांनी 100 विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.