Ind vs Aus: ॲडिलेडमध्ये रोहित-विराटची खास तयारी, आता ऑस्ट्रेलिया वरती होणार ‘दुहेरी वार’

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. शुबमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बराच काळानंतर पुन्हा क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले आहे. मालिकेचा पहिला सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात आला होता, जो रोहित-विराटसाठी काही खास ठरला नाही. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता भारतीय संघ पर्थमधील त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अ‍ॅडिलेडला पोहोचला आहे. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा केली जात आहे.

दीर्घ काळानंतर मैदानात पुनरागमन करणाऱ्या रोहित आणि विराटची कामगिरी काही खास ठरली नाही. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात हे दोघेही खेळाडू अपयशी ठरले. मात्र आता अ‍ॅडिलेडमध्ये रोहित-विराट टीमसाठी मोठ्या खेळी करण्याचा प्रयत्न करतील आणि पर्थमध्ये झालेल्या चुका टाळण्याचा निर्धार करतील.

अ‍ॅडिलेडला पोहोचताच रोहित आणि विराट यांनी नेट्सवर जोरदार सराव केला. या दोन्ही फलंदाजांनी तब्बल एक तास जोरदार फलंदाजीचा सराव केला. मागील सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून केवळ 8 धावा निघाल्या होत्या, तर विराट कोहली खातेही न उघडता बाद झाले होते.

Comments are closed.