माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले, मिंधेंच्या आमदाराची जाहीर कबुली
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता एका नवीन खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी कबुली गायकवाड यांनी दिली आहे. चिखली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
संजय गायकवाड म्हणाले आहेत की, “मिंधे गट आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे. चिखली मतदारसंघ एकेकाळी अतिशय मजबूत होता, पण हळूहळू कार्यकर्ता विखुरला गेला. मी महाराष्ट्रातील एक ताकदवर आमदार आहे आणि कुणालाही घाबरत नाही. आमची ताकद ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आहे. माझ्या मतदारसंघातील एकही माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला. उलट, माझ्यासोबत जे कार्यकर्ते कधीकाळी सायकलवर असायचे, त्यांना मी फॉर्च्युनरपर्यंत पोहोचवले आहे. यासाठी मी माझे ३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांच्या हितासाठी खर्च केले.”
Comments are closed.