‘स्पायडर-मॅन’ने हिंदुस्थानात रचला इतिहास , 500 कोटी रुपये कमावणारा ठरला पहिला हॉलिवूड चित्रपट
लहानांपासून मोठ्यांना भुरळ घालणारा ‘स्पायडर मॅन’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालतोय. या सिनेमाने हिंदुस्थानात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असून इतिहास रचला आहे. या सिनेमाने अवघ्या काही दिवसात 500 कोटीचा आकडा गाठला असून तो हिंदुस्थानात एवढी कमाई करणारा पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
‘स्पायडर मॅन’ या सिनेमाने हिंदुस्थानात पहिल्या दिवशी 60.60 कोटी रुपयांची कमाई करुन सुरुवात केली. या सिनेमाला 17 हजार शो मिळाले. दुसऱ्या दिवशी 49.35, तिसऱ्या दिवशी 70.25 कोटी, चौथ्या दिवशी 77.75 कोटी, पाचव्या दिवशी 23.80 कोटी, सहाव्या दिवशी 21.75कोटी, सातव्या दिवशी 17 कोटी, आठव्या दिवशी 14.25 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 334.75 कोटी रुपये कमावले.
नवव्या दिवशी या सिनेमाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 10व्या दिवशी सिनेमाने 31 कोटी, 11व्या दिवशी 34.70 कोटी, 12व्या दिवशी 7.60 कोटीचे कलेक्शन केले. या सिनेमाने एकूण 505.93 कोटी रुपये कमावले असून 423.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. यामुळे, हा चित्रपट हिंदुस्थानात 500 कोटींची कमाई करणारा पहिला हॉलीवूड चित्रपट ठरला. तसेच, तो स्पायडर-मॅन फ्रँचायझीमधील सर्वात यशस्वी चित्रपटही ठरला. या सिनेमाचे दिग्दर्शन डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी केले आहे. यात टॉम हॉलंड, सेडी सिंक आणि झेंडाया यांची प्रमुख भूमिका आहे.
Comments are closed.