स्पिन ट्रॅक होतायत ‘ट्रॅप’! भारतातील शेवटच्या 6 कसोटी सामन्यांचे धक्कादायक निकाल जाणून घ्या

कधी कधी आपण इतरांसाठी सापळा रचतो आणि त्यात स्वतःच अडकून पडतो. भारतीय कसोटा संघाचं सध्या हेच चित्र आहे. वेस्ट इंडीजसारख्या कमकुवत संघावर दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली, पण विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेसमोर मात्र टीम इंडिया गारद झाली. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळलेल्या मालिकेच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. स्वतःच्या उपयुक्त परिस्थितीतही भारतीय संघ अगदी 2-3 वर्षांपूर्वी भारतात येणाऱ्या परदेशी संघांसारखा गोंधळलेला दिसला.

बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सामन्यापूर्वीच म्हटलं होतं की पिचवर बॅट आणि बॉलची छान लढत पाहायला मिळेल. पेसर्सलाही मदत होईल. पेसर्सना मदत मिळाली खऱी, पण अपेक्षेपेक्षा जास्त स्पिनरच धडाकेबाज ठरले आणि यात सगळ्यात मोठं नुकसान भारताचंच झालं. भारतीय फलंदाजांना स्पिनचा कसलाच तोड सापडला नाही.

अहवालांनुसार, कोच गौतम गंभीर यांच्या सूचनेवरूनच ईडनवर स्पिन फ्रेंडली पिच तयार करण्यात आली होती. पण भारतासाठी हा स्पिन ट्रॅक मोठा सापळा ठरला. गेल्या 6 पैकी 4 सामन्यांत भारताला अशाच पिचवर पराभव स्वीकारावा लागला आहे. तीन वेळा न्यूझीलंडने आणि आता दक्षिण आफ्रिकेने भारताला गुडघे टेकायला लावलं. वेस्ट इंडीजविरुद्ध मात्र विजय मिळाला, पण त्यांच्या संघात क्वालिटी नसल्यानेच भारत वरचढ ठरला. तिथेही दुसऱ्या टेस्टमध्ये फॉलोऑन देऊनही विंडीजला भारत पटकन बाद करू शकला नव्हता.

टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. बेंचवर आकाश दीपसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. अशा वेळी स्पिनपुरतीच अनुकूल पिच तयार करून घेतली, तर त्याचा फायदा नेमका कोणाला? खेळपट्टीवर खरी लढत व्हावी, हेच अपेक्षित असताना स्पिन ट्रॅकवर विजय मिळवून तुम्ही WTC जिंकणार कसे? यंदाचं WTC फाइनल इंग्लंडमध्ये खेळलं जाणार आहे, जिथे पिच स्विंग आणि सीमला फायदा देतात, म्हणून घरच्या मैदानावर स्पिनवर अवलंबून राहण्याचा उपयोग काय?

Comments are closed.