IPL 2025 मध्ये फिरकीचा कहर! हे 3 फिरकीपटू ठरतील फलंदाजांसाठी डोकेदुखी?
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. 3 असे घातक फिरकीपटू गोलंदाज आहेत जे आयपीएल 2025 स्पर्धेत फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि विरोधी संघाचा धुवा उडवू शकतात. चला तर जाणून घेऊया की कोणते ते 3 फिरकीपटू गोलंदाज आहेत, ते आयपीएल 2025 मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेऊ शकतात.
वरुण चक्रवर्ती
कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आयपीएल 2025 मध्ये फलंदाजांसाठी खूप भयानक ठरू शकतो. वरूण चक्रवर्ती आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करत आला आहे. मागच्या वर्षी आयपीएल 2024 मध्ये वरूणने 21 विकेट्स घेतल्या होत्या. वरूण चक्रवर्तीची घातकी गोलंदाजी फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकते. वरूण चक्रवर्ती आयपीएलच्या खतरनाक फिरकीपटू गोलंदाजांमध्ये एक मानला जातो. वरूण चक्रवर्तीने आयपीएलच्या 70 सामन्यात 24.12 च्या गोलंदाजी सरासरीने 83 विकेट्स घेतलेल्या आहेत. ज्यामध्ये त्याचं बेस्ट बॉलिंग प्रदर्शन 20 धावा देऊन 5 विकेट्स घेणे आहे.
सुनील नरेन
कोलकाता नाईट रायडर्ससाठी सुनील नरेन आयपीएल मध्ये फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. सुनील नरेनला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात कोलकाताने 12 करोड रुपयांना खरेदी केले होते. मागच्या वर्षी कोलकातासाठी सुनील नरेनने 17 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सुनील नरेनचं आत्तापर्यंतचं आयपीएल रेकॉर्ड बघितलं तर, त्याने उत्तम प्रदर्शन केलेलं आहे. त्याने आयपीएलच्या 176 सामन्यात 25.39 च्या गोलंदाजी सरासरीने 180 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 19 धावा देऊन 5 विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत. यावर्षीही तो विरोधकांसाठी घातक ठरू शकतो.
कुलदीप यादव
कुलदीप यादवने कायमच आयपीएल स्पर्धेमध्ये शानदार प्रदर्शन केल आहे. कुलदीपने 84 सामन्यांमध्ये 87 विकेट्स घेतलेल्या आहेत. कुलदीप यादव आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतो. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ही 14 धावा देऊन 4 विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत. कुलदीप यादव पावर- प्ले मध्ये फलंदाजांसाठी खूप घातक ठरू शकतो. या हंगामात पर्पल कॅप जिंकण्याचा कुलदीप दावेदार ठरू शकतो.
Comments are closed.