'या' 3 कारणांमुळे पाकिस्तानविरुद्ध वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान मिळणार?
सध्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) थरार रंगला आहे. दरम्यान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. भारताने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. आता भारतीय संघ उद्या (23 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. हा हायव्होल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही संघ या मोठ्या सामन्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला असला तरी, दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये अजूनही काही बदल होऊ शकतात. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेइंग 11 मध्ये वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) स्थान मिळू शकते. याची 3 कारणे जाणून घेऊया.
1) प्लेइंग 11 मध्ये उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाची उपस्थिती फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणात बदल घडवून आणेल.- बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात, तिन्ही फिरकीपटू डावखुरे होते. (कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा). अशा परिस्थितीत, पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये वरुण चक्रवर्तीचा समावेश केल्याने फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणातही बदल होईल. वेगवेगळ्या हातांनी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचा सामना करणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल. यामुळे त्यांच्यावर दबाव येऊ शकतो.
2) वरुण चक्रवर्ती उत्तम फॉर्ममध्ये आहे.- आयपीएल 2024 नंतर, जेव्हा वरुण चक्रवर्तीने भारतीय संघात पुनरागमन केले, तेव्हा तो एकामागून एक संस्मरणीय कामगिरी करत आहे. अलिकडेच, इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत, त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि मालिकावीराचा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला. याच कारणास्तव त्याला भारताच्या वनडे संघातही स्थान मिळाले. जर चक्रवर्तीला पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले, तर तो त्याच्या फिरकीने विरोधी फलंदाजांना त्रास देऊ शकतो.
3) कुलदीप यादव फॉर्ममध्ये नाही.- बांगलादेशविरुद्ध मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु तो प्रभावित करू शकला नाही. कुलदीपने त्याच्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये 43 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही कुलदीपची कामगिरी निराशाजनक होती. अशाप्रकारे पाहिले तर, जर कुलदीप यादवला वगळले आणि वरुण चक्रवर्तीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळवले तर ते संघासाठी फायदेशीर ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका ? विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत
माजी दिग्गजाने विराट कोहलीच्या फाॅर्मविषयी व्यक्त केली चिंता! म्हणाला…
भारत विरुद्ध पाकिस्तान: शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोण चमकले, कोण झाले नामोहरम?
Comments are closed.