IND vs WI: फिरकीपटूंच्या जाळ्यात फलंदाज अडकणार? जाणून घ्या अहमदाबादच्या खेळपट्टीचा अंदाज!
आशिया कप (Asia Cup) जिंकल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली या मालिकेतही भारतीय संघ जोरदार कामगिरी करताना दिसेल. भारताने करिबियाई संघाविरुद्ध शेवटचा सामना 2002 मध्ये गमावला होता. रेस्टनंतर केएल राहुल (KL Rahul & yashsvi Jaiswal) आणि यशस्वी जयस्वाल प्लेइंग 11 मध्ये परत येतील आणि या दोघांना फलंदाजीची सुरुवात करताना चाहत्यांना पाहायला मिळेल.
इंग्लंडमध्ये आपल्या गोलंदाजीने जोरदार कामगिरी करणारा मोहम्मद सिराजही (Mohmmed Siraj) या मालिकेत चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दुसरीकडे, रोस्टन चेजच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजही जुने रेकॉर्ड विसरून यावेळी जबरदस्त कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील (IND vs WI) मालिकेचा पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये येथे काही सामने फक्त अडीच दिवसातच संपले आहेत, जेव्हा स्पिनर्सने फलंदाजांवर आपला कहर दाखवला.
फिरणाऱ्या चेंडूंच्या समोरं फलंदाजांसाठी येथे धाव मिळवणं खूप कठीण असतं. सुरुवातीच्या एक-दोन दिवसांमध्ये खेळपट्टी थोडी मदत करू शकते, पण तिसऱ्या दिवसापासून स्पिनर्स पूर्णपणे हावी होतात.
अहमदाबादच्या या मैदानावर आतापर्यंत 15 कसोटी सामने झाले आहेत. यातील 4 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर चेज करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत. पहिल्या डावामध्ये सरासरी धावसंख्या 347 होती, तर दुसऱ्या डावामध्ये 353 धावा सरासरी होत्या. तिसऱ्या डावामध्ये सरासरी धावसंख्या 232 होती. चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे खूप कठीण ठरते. शेवटच्या डावात सरासरी धावसंख्या 147 होती. या मैदानावर दक्षिण आफ्रिकाने भारताविरुद्ध फक्त 105 धावा करून सामना जिंकला होता.
Comments are closed.