क्रीडा खात्याचं बरं होतं लय त्रास नव्हता; आता त्रास घ्यावाच लागेल…;कृषिमंत्री दत्तात्रय भरणें
इंदापूर: क्रीडा व अल्पसंख्यांक खात्याचे बरं होतं लय त्रास नव्हता, आता त्रास घ्यावाच लागेल, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. त्यानंतर आता हा त्रास नाही म्हणता येत जबाबदारी आहे” असे म्हणत कृषिमंत्री भरणे यांनी परत आपल्याच वक्तव्यावर लगेचच सारवासारव केली. भरणेंच्या या वक्तव्यानंतर आता त्यांना कृषीमंत्री पदाचा त्रास होतोय का? भरणे यांच्या या विधानाने त्यांना कृषी मंत्री पद पेलवत नाहीये का? त्यांना या पदाचा भार झेपत नाही का? अशा प्रकारच्या चर्चांना तोंड फुटलं आहे.
क्रीडा व अल्पसंख्याक खात बरं होतं….
इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधणे या भूमिपूजन समारंभात कृषिमंत्री भरणे बोलत होते. भरणे त्यांच्या भाषणात ते म्हणाले, “परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मराठवाड्यात होतो, त्यामुळे जरा पळावे लागते, फिरावे लागते. क्रीडा व अल्पसंख्याक खात बरं होतं, लय त्रास नव्हता पण आता त्रास घ्यावाच लागेल” असे विधान कृषिमंत्री भरणे यांनी केले त्यानंतर तात्काळ त्यांनी लगेच सारवा सरव करीत म्हटलं की, “पण हा त्रास नाही ही जबाबदारी आहे आपल्या हा नेत्यांनी विश्वास टाकलेला आहे”, असे म्हणत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा सारवा सरव केली. मात्र भरणे यांच्या या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, क्रीडा व अल्पसंख्यांक खात बरं होतं लय त्रास नव्हता याचा अर्थ आता कृषिमंत्री झाल्यावरती खूप त्रास आहे असेच त्यांना सांगायचं होतं का? त्यामुळे भरणे यांना कृषी मंत्री पद हे झेपत नाही की का? असाच प्रश्न आता निर्माण होत आहे.
नेमकं काय म्हणाले?
‘क्रीडा आणि अल्पसंख्यांक खातं बरं होतं त्याचा जास्त त्रास नव्हता.’ या विधानानंतर लगेचच त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली. त्रास नाही तर ही जबाबदारी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दत्तात्रय भरणे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच कृषी खात्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी आपल्या पूर्वीच्या खात्यांची तुलना सध्याच्या कृषी खात्याशी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी मोठी असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. या विधानानंतर त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत, आपल्या शब्दांचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले. हे विधान त्यांच्या नवीन जबाबदारीच्या संदर्भात आले आहे.
शेतकरी कर्जमाफी 100% झाली पाहिजे
शेतकरी कर्जमाफी 100% झाली पाहिजे, शेतकरी म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मी शेतकरी पुत्र, माझा जन्म शेतकरी घरात झाला. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, रात्री झोपायला गेल्यावर ही शेती दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहित आहेत, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील
धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता कर्जमाफी बाबत कृषी मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत कृषी मंत्रालय वादात सापडले. त्यामुळे कृषिमंत्री बदलायची वेळ आली. नव्याने कृषी मंत्री झालेल्या दत्तात्रय भरणे यांनी धाराशिवमध्ये पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी दौरा केला. यावेळी एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. सकाळी उठल्यावर मला शेती दिसते. रात्री झोपतानाही शेती दिसते. शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचं मत व्यक्त करताना कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी घेतील असं भरणे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=nfq02enhwzg
आणखी वाचा
Comments are closed.