खेळाडूंसाठी स्फूर्तिदायक ठरला खेळ महोत्सव, दक्षिण-मध्य मुंबईतील खेळ महोत्सवाची दिमाखात सांगता
स्थानिक खेळाडूंमधील कौशल्याला चालना मिळावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत खेळ महोत्सवाचे दिमाखदार आणि जोशपूर्ण आयोजन करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला खेळ महोत्सव खेळाडूंसाठी स्फूर्तिदायक ठरला आहे. या महोत्सवाची सांगताही दिमाखात झाली.
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने दक्षिण-मध्य मुंबईत खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळ महोत्सवात पुरुष आणि महिला क्रिकेट, खो-खो, बुद्धिबळ, पॅरम, फुटबॉल, पंजा, रस्सीखेच, मल्लखांब, अॅक्रोबेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, योगा, चित्रकला, बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच दहिहंडी अशा 18 खेळांचा समावेश होता. 8 व 9 मार्च रोजी झालेल्या क्रिकेट स्पर्धेद्वारे खेळ महोत्सवाचा शानदार समारोप झाला. क्रिकेट स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना धारावीच्या स्वर्गीय मुत्तू तेवर संघाने जिंकत विजेतेपद पटकावले, तर गोवंडी संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेच्या अंतिम सोहळय़ात स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक राकेश देशमुख, सुनीता आयरे, दत्ता घाटकर, अभिषेक बासुतकर, मालन कदम, उर्मिला पांचाळ, अरदीप सिंह लाली, विलास राणे, सुरेश काळे, धनश्री पवार, दीपक पाटील, गीता दळवी, वंदना अहिरे, प्रशांत घाडीगावकर, विश्वास निमकर, वंदना मोरे, नितीन पेडणेकर, रवींद्र घोले, जिनेश भेदा, सरिता मांजरे, विशाल जाधव, मयूर कांबळे, प्रदीप कदम, किरण देशमुख, अजय गुरव, प्रफुल सोलंकी, सतीश नाटेकर, अनिकेत संकपाळ, सायली दळवी, सुरेश खेडेकर, निकेश गावंड, नीलेश कांबळे, अरूण फाटक आणि प्रदीप जावळे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खासदार अनिल देसाई यांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारच्या क्रीडा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
Comments are closed.