रात गई बात गई… पत्रकाराने ‘तो’ प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे म्हणाले, नवी इनिंग जोरदार
मणक्राव कोकेटे: विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत सापडले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच आज (दि.17) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी अजित पवार संवाद साधणार आहेत. अजित पवारांच्या दौऱ्यात माणिकराव कोकाटे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आपण नवी इनिंग जोरदार खेळणार, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री असताना त्यांचा जळगाव जिल्हा रद्द झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे माझा दौरा रद्द झाला होता. आज इथे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज मेळाव्यासाठी उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रात्री बोलण्यासाठी गेली …
कृषीमंत्री असताना आपल्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, रात गई बात गई…. प्रत्येक गोष्टीत मागचं उकरून काढण्यात काही उपयोग नाही. आता पुढे चला. पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा. लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल, त्या संदर्भात बोलू. मागे काय झाले त्यात खोलात जाण्याची काही आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले.
नवी इनिंग जोरदार खेळणार!
आपल्याकडे आता क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. क्रीडा क्षेत्रातील समस्या आपण कशा सोडवणार? आपली नवी इनिंग कशी असणार? असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, नवी इनिंग जोरदार खेळणार, तुम्ही काळजी करू नका, एकदम जोरदार खेळणार, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार जळगाव दौऱ्यावर
दरम्यान, अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रविवारी, 17 ऑगस्ट रोजी अजित पवार जळगाव शहरात थांबणार आहेत. यावेळेत ते काही शासकीय कामांसह महत्त्वाच्या राजकीय बैठका आणि मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. पक्षातील फुटीनंतर ते प्रथमच पक्ष संघटनेच्या कामासाठी जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्यादरम्यान काही नवीन पक्षप्रवेश देखील होणार आहे. त्यामध्ये विशेषतः काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे या त्यांच्यासोबत आणि काही सरपंचांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.