पाकिस्तानच्या नापाक कुरापती, महिला विश्वचषकात ‘आझाद काश्मीर’ म्हणत भारताला डिवचलं
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सना मीरने बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भाष्य करताना केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 (Women’s ODI World Cup 2025) दरम्यान केलेल्या या वेळव्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी “आझाद काश्मीर” चा (Azad Kashmir) उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केला आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान (Bangladesh vs Pakistan) ही घटना घडली, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानी संघ फक्त 128 धावांवर कोसळला.
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यादरम्यान नतालिया परवेझच्या पार्श्वभूमीवर चर्चा करताना, सना मीर (Sana Mir) म्हणाली की, परवेझ “आझाद काश्मीर” मधून येतो. तिच्या या विधानामुळे भारतीय चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत आणि ते सर्व स्थरातून जोरदार ट्रोल करत आहेत. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु पाकिस्तान अनेक दशकांपासून त्यावर दावा करत आहे.
भारतीय चाहत्यांकडून टीकेची झोड (‘Azad Kashmir’ Comment In Women’s World Cup Sparks Controversy)
दरम्यानआशिया कप ट्रॉफीचा वाद अद्याप संपलेला नसताना पाकिस्तान सातत्याने बदनामी कृत्य करत असल्याचे दिसून येत आहे? अशातच भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता, सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी “आझाद काश्मीर” चा वापर केल्याने एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो. आशिया कप 2025 मध्ये, भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. अंतिम सामना जिंकल्यानंतर, टीम इंडियाने पीसीबीचे अध्यक्ष आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हा ट्रॉफी वाद अजूनही सुरू आहे.
काय आहे 'अझाद काश्मीर' @आयसीसी @बीसीसीआय? हे जागतिक टप्प्यावर वापरणे अपमानकारक आहे. @जयशाह @Mithunmanhasत्वरित, कठोर कारवाई करा – बॅन सना मीर. तेथे 'अझाद काश्मीर' नाही. अशा भारतविरोधी प्रचारात क्रिकेटमध्ये स्थान नाही!#Pakvs #CWC25
pic.twitter.com/vyg4cubtoj– मार्को (@सुपरमेसिर 10) 2 ऑक्टोबर, 2025
लवकरात लवकर सना मीरला कमेंट्री पॅनलमधून काढा (India-Pakistan Controversy)
अशातच पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश विश्वचषक सामन्यादरम्यान “आझाद काश्मीर” असा उल्लेख करणाऱ्या सना मीरला कदाचित हे माहित नसेल की तिने बोललेल्या फक्त दोन शब्दांमुळे मोठा वाद निर्माण होईल. सोशल मीडियावरील भारतीय चाहते तिला सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत हे निश्चित आहे. एका भारतीय चाहत्याने सना मीरला लवकरात लवकर कमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली. परिणामी या वादग्रस्त विधानावरून पुढे नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे?
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.