इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र…

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इमरान खान सध्या तुरुंगात असून त्यांची प्रकृती खराब असल्याचे रिपोर्ट समोर आले होते. यानंतर क्रिकेटमधील दिग्गजांकडून पाकिस्तान सरकारला पत्र लिहिण्यात आलं आहे. कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहिलं आहे. इमरान खान यांच्यावर तुरुंगात योग्य उपचार करण्यात यावेत, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे करण्यात आली आहे. इमरान खान 800 पेक्षा जास्त दिवस तुरुंगात आहे. इमरान खान यांची प्रकृती बिघडत असून तुरुंगात त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाब प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

इमरान खान यांच्यासाठी कोणी पत्र लिहिलं?

इमरान खान यांची बहीण अलीमा खानम यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. इमरान खान यांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांची प्रकृती बिघडत असल्यानं  अलीमा खानम यांनी आवाज उठवला होता. कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह बेलिंडा क्लार्क, ग्रेग चॅपल, मायकल एथरटन, सुनील गावस्कर, कपिल देव, नासिर हुसेन, इयान चॅपल, माइकल ब्रियरली, एलन बॉर्डर, डेविड गावर, किम ह्यूजेस, क्लाइव लॉयड, स्टीव वॉ आणि जॉन राइट यांनी पाकिस्तान सरकारला लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

इमरान खान दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. इमरान खान यांची उजव्या डोळ्याची दृष्टी केवळ 15 टक्के राहिली असल्याचा दावा एका वकिलानं कोर्टात केला होता. अधिकाऱ्यांनी तीन महिने त्यांच्या तक्रारीवर काही केलं नसल्याचा दावा त्या वकिलानं केला होता.

सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासह जगभरातील 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहून  इमरान खान यांच्यावर तुरुंगात योग्य उपचार केले जावेत, अशी मागणी केली आहे.  पाकिस्तानचे माजी कॅप्टन आणि वर्ल्ड क्रिकेटचे महान खेळाडू यांच्यासोबत कथितपणे जे वर्तन तुरुंगात करण्यात आले त्याबद्दल आणि त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करतो, असं माजी कर्णधारांनी म्हटलं आहे.

इमरान खान यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण जगात त्यांचं कौतुक केलं जातं. कॅप्टन म्हणून त्यांनी पाकिस्तानला 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून दिला होता. तो विजय इमरान खान यांचं कौशल्य, खिलाडूवृत्ती, भक्कम नेतृत्त्वामुळं मिळाला होता. इमरान खान यांनी जगातील नव्या पिढ्यांना प्रेरणा दिली. आम्ही त्यांच्यासोबत मैदानावर खेळलो आहोत, त्यांच्याकडून शिकलो आहोत. ते चांगल्या ऑलराऊंडर्सपैकी एक आहेत, त्यांचा सर्वजण सन्मान करतात. क्रिकेट मधील योगदानाशिवाय पंतप्रधान होत इमरान खान यांनी पाकिस्तानची सेवा केली, आव्हानात्मक स्थितीत पाकिस्तानचं नेतृत्व केलं, असं पत्रात म्हटलंय.

इमरान खान यांची प्रकृती बिघडत असल्यानं लिहिण्यात आलेल्या पत्रात असं म्हटलं गेलंय की, इमरान खान यांच्या प्रकृती संदर्भातील बातम्यांमुळं आम्ही चिंताग्रस्त आहोत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.