संकर्षण व्हाया स्पृहा @ 175

नाटकासारखी जड संहिताबंधनं नसलेला अपारंपरिक, सुंदर गोष्टी-गाणी-कवितांचा कार्यक्रम म्हणून नावारूपास आलेला ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ आता लवकरच शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा करतो आहे. हलकेफुलके विनोद, अर्थपूर्ण कविता आणि प्रेक्षकांशी सहज नातं जोडणारी शैली यामुळे या कार्यक्रमाने आपला एक प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय हे नक्की.

संकर्षण कऱ्हाडेची भावस्पर्शी कविता आणि स्पृहा जोशीचे नितळ कथन यांच्या माध्यमातून बालपण, नाती, प्रेम, आठवणी आणि आयुष्याच्या छोटय़ा छोटय़ा क्षणांचे सुंदर वर्णन या प्रयोगात अनुभवता येते. विशेष म्हणजे राजकीय आणि सामाजिक कवितादेखील या कार्यक्रमात रसिकांची दाद मिळवतात.

स्मृतिगंध निर्मित आणि गौरी थिएटर्स प्रस्तुत ‘संकर्षण व्हाया स्पृहा’चा 28 नोव्हेंबर रोजी काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे येथे, 29 नोव्हेंबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण तर 30 नोव्हेंबर रोजी मास्टर दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले असे सलग तीन दिवस अनुक्रमे 173, 174 आणि 175 वा प्रयोग रंगणार आहे. कोणत्याही वयोगटाला, कुटुंबासह येणाऱयांना, मित्रमैत्रिणींना अशा सगळय़ांना एकत्र येऊन अनुभवता येईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम अजूनही पाहिला नसेल तर आवर्जून पाहावा असा आणि आधी पाहिला असेल तर पुनर्प्रत्ययाचा आनंद घ्यायला आवडेल असा आहे.

Comments are closed.