817 रेटिंग! भारतीय फिरकीपटूचा आयसीसी टी20 क्रमवारीत जलवा, सर्वकालीन नवा विक्रम करत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला टाकले मागे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (29 सप्टेंबर) महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताच्या फिरकीपटूने ऐतिहासिक रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. श्री चरणीने या क्रमवारीत टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम 817 रेटिंग पॉइंट मिळवले आहेत. यामुळे ती या प्रकारातील सर्वाधिक मानांकित सर्वकालिन गोलंदाज ठरली असून तिने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकले आहे.
चरणीने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटचा 2018 मध्ये नोंदवलेला 806 रेटिंग पॉइंटता विक्रम मोडला आहे. चरणीचे रेटिंग आतापर्यंतच्या महिला टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीतील सर्वोच्च (सर्वकालिन) रेंटिग पॉइंट ठरले आहे.
अलीकडेच 22 वर्षीय भारतीय फिरकीपटूने संघाच्या विजयी आशिया चषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेत महत्त्वाची कामगिरी केली आहे. तिने आशिया चषकात 12 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील 20 धावांत 4 विकेट्सचा समावेश आहे. तो सामना भारताने 72 धावांनी जिंकत आठव्यांदा आशिया चषक जिंकला.
त्याचबरोबर जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चरणीने यजमान जपानविरुद्ध 10 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. तिची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर 22 सप्टेंबरला झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने श्रीलंकेला 147 धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यातही चरणीने दोन विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरही भारताचीच खेळाडू आहे. दीप्ती शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स घेतले. यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत तिचे 754 पॉइंट झाले असून, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन 723 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताला फलंदाजी क्रमवारीतही मोठा फायदा झाला आहे. स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आयसीसी महिला टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 79 धावा केल्या होत्या. यामुळे ती पाचव्या (754) स्थानी आली आहे.
फलंदाजी क्रमवारीत भारताची आणखी एक खेळाडू पहिल्या पाचमध्ये आहे. स्मृतीची सलामीची पार्टनर शफाली वर्मा या क्रमवारीत चौथ्या (759) स्थानी आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी आहे. (Sree Charani sets all-time ICC Women’s T20I Rankings record with 817 rating points)
Comments are closed.