KKR vs SRH: केकेआरविरुद्ध अभिषेक शर्मा- ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! पॉवरप्लेमध्ये हैदराबादचा ऐतिहासिक विक्रम
आयपीएल 2026 स्पर्धेच्या (Indian premiere league) सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात ईडन गार्डन्सवर अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या हैदराबादने 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 226 धावांचा विशाल स्कोअर उभा केला.
सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Travis Head) आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पॉवरप्लेमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा ठोकल्या.
या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे हैदराबादने पहिल्या 6 षटकांमध्ये 1 बाद 84 धावा केल्या. याचसोबत हैदराबादने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासातील हैदराबादची ही चौथी सर्वात मोठी पॉवरप्ले धावसंख्या ठरली आहे.
SRH चे आयपीएलमधील सर्वात मोठे पॉवरप्ले स्कोअर्स:
125/0 – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (2024)
107/0 – विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (2024)
94 धावा – विरुद्ध राजस्थान रॉयल्स (2025)
84 धावा – विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (2026)
Comments are closed.