श्रीलंकेचा धमाकेदार विजय, अफगाणिस्तान आशिया कपमधून बाहेर, सुपर-4चं शेड्यूल ठरलं! जाणून घ्या A ट
श्रीलंकेने अफगाणिस्तान एशिया कप सुपर 4 ने पराभूत केले : सुपर 4 पात्रता सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह, रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सुपर-4 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या विजयाने बांगलादेशलाही सुपर-4 साठी पात्र ठरविले. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिस सामन्याचा नायक होता.
कुसल मेंडिसने तुफानी खेळी
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले आणि विजय मिळवला. त्याने 52 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. कुसल परेराने 20 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा केल्या. कामिंदू मेंडिसने 13 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, मोहम्मद नबीच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान 169 धावा करू शकला.
श्रीलंकेने त्यांच्या मज्जातंतूंना धरून ठेवले आणि ओळीवर जा! ✌
His त्यांच्या नसा आणि त्यांच्या आचरणात शांतता रोमांचकारी विजय आणि 🇱🇰 + 🇧🇩 सुपर 4 वर प्रगती करणे इतकेच आहे!#एसएलव्हीएएफजी #Dpworldasiacup2025 #सीएसी pic.twitter.com/e91euj7hga
– एशियानक्रिकेटकॉन्सिल (@accmedia1) 18 सप्टेंबर, 2025
मोहम्मद नबीने घातला धुमाकूळ
आशिया कप 2025 मध्ये अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या. यावेळी त्याने दुनिथ वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. 71 धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतर नबी मैदानात उतरला. त्याने राशिद खान (24) सोबत सातव्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. 18 षटकांनंतर अफगाणिस्तानचा स्कोर 120/7 होता, तेव्हा नबी 10 चेंडूत 14 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने 19व्या षटकात चमीराच्या गोलंदाजीवर 19 धावा काढल्या आणि अखेरच्या षटकात वेल्लालागेला पाच षटकार मारले.
सर्वात वेगवान अर्धशतकांमध्ये नबीचा समावेश
नबीने फक्त 20 चेंडूत अर्धशतक ठोकत अफगाणिस्तानकडून टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम अजमतुल्लाह उमरझईसोबत संयुक्तरित्या आपल्या नावे केला. उमरझईने हाँगकाँगविरुद्ध एवढ्याच चेंडूत अर्धशतक ठोकले होते. या यादीत त्यानंतर नबी आणि गुलबदीन नाईब यांचे नाव असून त्यांनी 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
सुपर-4चं शेड्यूल ठरलं! जाणून घ्या A टू Z
भारत आणि पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये ग्रुप अ मधून आधीच पात्रता मिळवली होती. पण, गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालाने श्रीलंका आणि बांगलादेश या ग्रुपमधून सुपर फोरमध्ये पात्र ठरतील हे निश्चित केले. अफगाणिस्तानने हा सामना गमावला. अशाप्रकारे, ओमान आणि युएई ग्रुप अ मधून बाहेर पडले आणि अफगाणिस्तानचा प्रवास ग्रुप ब मधून हाँगकाँगनंतर संपला.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश
25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
28 सप्टेंबर – अंतिम सामना
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.