टी-20 विश्वचषकापर्यंत श्रीलंकेची धुरा शनाकाकडेच

आगामी टी-20 विश्वचषकाच्या अखेरपर्यंत दासुन शनाका श्रीलंकेच्या टी-20 संघाचे नेतृत्व करणार असल्याचे नवे मुख्य निवड समिती प्रमुख प्रमोदया विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केले. मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्णधारपदावरून दूर करण्यात आलेला चरिथ असलंका संघात कायम असून त्याच्या सामान्य कामगिरीमुळे नेतृत्व बदल करण्यात आला आहे. तसेच श्रीलंकेने 25 खेळाडूंचा प्राथमिक संघही जाहीर करण्यात केला असून विश्वचषकानंतर संघबांधणीवर नव्याने विचार होणार आहे. दीर्घ काळानंतर निरोशन डिकवेल्लाचेही संघात पुनरागमन झाले आहे.
श्रीलंकेचा प्राथमिक संघ ः दासुन शांका (कर्नाधर), पथुम निस्का, कुसल मेशारा, कुसल परेरा, धनंजय डिसिलवा, निरोशन डिकवेल्ला, जानिथा लियानेगे, चरित असलदी, कामिंदू असलादीस, पवन रत्नाके, सहान अरचिगे, वनिंदू हसरांगे, दुनिथरा, दुनिथरा, दुनिथरा, इ. मल्गा, दुष्मंथा चमिरा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना, दिलशान मधुशांका, महेश तिक्षाना, दुशान हेमंथा, विजयकांत विसाकांत आणि ट्रावे मथू.

Comments are closed.