पाकिस्तान जिंकून हारले! वर्ल्ड कपमधून बाहेर, श्रीलंकेनं हिरावला तोंडचा घास
T20 विश्वचषक 2026 पाकिस्तान : टी-20 विश्वषचकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेनं शेवटपर्यंत झुंज दिली. श्रीलंकेनं 207 धावा केल्या. पाकिस्तानने अवघ्या 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला असला तरी पाकिस्तान टी-20 विश्वषचकातून बाहेर पडला आहे. सेमीफायनला जाण्याचा दरवाजा पाकिस्तानसाठी कायमचा बंद झाला आहे.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला 147 धावांवर रोखने गरजेचे होते
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानची आज श्रीलंकेसोबत शेवटची लढाई होती. जर हा सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला असता आणि नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला तीन गुणांसह मागे टाकले असते तर पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला. असता. आज पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचा डोंगर उभा केला होता. पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला 147 धावांवर रोखने गरजेचे होते. मात्र, ते शक्य झालं नाही. श्रीलंकेच्या संघानं कडवी झुंज देत 207 धावा केल्या. फक्त 5 धावांनी पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तान जरी विजयी झाला असला तरी त्यांचा सेमीफायनलचा पत्ता कट झाला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.