श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारीचा आरोप, १२ हिंदुस्थानी मच्छिमारांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने १२ हिंदुस्थानी मच्छिमारांना अटक केली असून त्यांची एक नौकाही जप्त केली आहे. ‘पीटीआय’ने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई ११ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.

श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ११ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत, जाफनामधील काराइनगर येथील कोविलम किनारपट्टीजवळ हिंदुस्थानी मच्छिमार मासेमारी करत असताना त्यांना पकडण्यात आले. यावेळी त्यांची मासेमारीची नौकाही ताब्यात घेण्यात आली आहे.

कारवायांचे सत्र सुरूच

मच्छिमारांवरील कारवाईचे हे सत्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. याआधी ८ एप्रिल रोजी श्रीलंकेच्या नौदलाने मन्नारच्या उत्तर समुद्र क्षेत्रातून १० हिंदुस्थानी मच्छिमारांना अटक केली होती आणि त्यांची नौका जप्त केली होती. श्रीलंकेच्या हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा ठपका या मच्छिमारांवर ठेवण्यात आला आहे.

Comments are closed.