झेवियर्स कॉलेजच्या ‘आमोद’ची नांदी; मराठी भाषा, साहित्य-संस्कृतीचा महोत्सव लवकरच

विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या ‘आमोद’ महोत्सवाची नांदी झाली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीला वाहिलेला ‘आमोद’ महोत्सव येत्या 9, 16 आणि 17 जानेवारी रोजी होणार आहे. ‘आमोद’चे यंदाचे 102 वे वर्ष आहे. ‘लोककलेची नवी स्वारी’ ही या वर्षीची संकल्पना आहे. यानिमित्ताने लोककलेला आधुनिक दृष्टिकोनातून नव्याने साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यापूर्वी ‘आमोद’च्या व्यासपीठावर सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अजय-अतुल यासारख्या कलावंतांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. परंपरा, सर्जनशीलता आणि नव्या पिढीचा उत्साह यांचा संगम असलेला ‘आमोद 2026’ बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवात मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन झेवियर्सच्या मराठी वाङ्मय मंडळाने केले आहे.

Comments are closed.