घाटकोपर मेट्रो स्थानकात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

मुंबई लोकलची गर्दीची समस्या ही काही नवी नाही. पण आता मेट्रोतही लोकलसारखी गर्दी व्हायला लागली आहे. घाटकोपर स्थानकावरी पुलावर अक्षरशः चेंगाचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईत घाटकोपर ते अंधेरीदरम्यान पहिली मेट्रो सुरू झाली होती, या मेट्रोला प्रवाशांनी इतका प्रतिसाद दिला आहे की या मार्गावरही पिक अवरला लोकलसारखी गर्दी होते. घाटकोपर रेल्वे स्थानकावरच मेट्रोचे स्थानक आहे. मध्य रेल्वेतून प्रवास करून अंधेरी भागात जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते. घाटकोपर स्थानकावरचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यात प्रचंड गर्दी दिसते, प्रवासी एस्कलेटर वापरत आहेत आणि मेट्रोमध्ये प्रवेश करण्यासाठी रस्ता शोधत आहेत. जर थोडीशी चूक झाली असती, तर मोठा अपघात होऊ शकला असता. अनेक नेटकर्‍यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी अधिकाऱ्यांकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.