परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा; आखाती देशातील नागरिकांना राज्य सरकारचे आवाहन
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परदेशातील राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा आणि कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
सतर्कता आणि खबरदारीचे आवाहन
परराष्ट्र मंत्रालयाने आणि संबंधित देशांतील दूतावासांनी हिंदुस्थानी नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. विशेषतः पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) या भागांत राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना अनावश्यक हालचाल टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारचा केंद्राशी समन्वय
महाराष्ट्र शासन आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत गंभीर असून केंद्र सरकार आणि संबंधित देशांतील हिंदुस्थानी दूतावासांशी सतत संपर्कात आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हिंदुस्थानी दूतावासांनी २४x७ हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित केले आहेत. नागरिकांनी केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन: +970592916418
ईमेल: [email protected] / [email protected]
दोहा, कतार)
फोन: 00974-55647502
ईमेल: [email protected]
रियाध (सौदी अरेबिया)
फोन: ००-९६६-११-४८८४६९७
व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८
टोल फ्री: 800 247 1234
ईमेल: [email protected]
तेल अवीव (इस्रायल)
फोन: +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल: [email protected]
तेहरान (इराण)
फोन: +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री: 800-46342
WhatsApp: +971543090571
ईमेल: [email protected] / [email protected]
कुवेत
फोन: +96565501946
ईमेल: [email protected]
बाहेरचा माणूस
फोन: 00973-39418071
मस्कत
टोल फ्री: 80071234
WhatsApp: +96898282270
ईमेल: [email protected] / [email protected]
जॉर्डन
फोन: 00962-770 422 276
बगदाद, इराक)
फोन: +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट: https://eoibaghdad.gov.in
ईमेल: [email protected] / [email protected] / [email protected]
Comments are closed.