यशवंत व्हा! आजपासून दहावीची परीक्षा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. एकूण 23 हजार 683 शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 3 हजार 879 इतकी विद्यार्थी नोंदणीत वाढ झाली आहे. राज्यातील 5 हजार 111 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 18 मार्चला दहावीचा शेवटचा पेपर असेल.
n सकाळच्या सत्रात 10.30 पर्यंत तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर हजर असणे अनिवार्य आहे.
n परीक्षा काळात विद्यार्थी दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाकडून 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नऊ विभागीय मंडळांत नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
n गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.
Comments are closed.